28
Jul 25
फळबाग लागवड

म ग्रा रो ह यो अंतर्गत फळबाग लागवड. गाव वसगडे.. मा आमदार महाहाडिक सो यांच्या उपस्थित लागवड शुभारंभ.

अधिक माहिती...
5
Jul 25
फळबाग लागवड, मग्रारोह यो अंतर्गत वैयक्तिक कामाला मंजुरी.

श्रीमती कुसुम रामचंद्र मोरे. राहणार वसगडे तालुका करवीर यांच्या प्रक्षेत्रावर ती माननीय आमदार महाडिक साहेब. यांच्या हस्ते आंबा फळ पिकाची लागवड करण्याचा शुभारंभ करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती श्वेता बेळगुंदकर, गावचे सरपंच उपसरपंच व बहुसंख्या शेतकरी यावेळी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी श्री संतोष पाटील करवीर यांनी मार्गदर्शन केले

अधिक माहिती...
27
Jun 25
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड मौजे - ठमकेवाडी ता. शाहुवाडी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील मौजे - ठमकेवाडी गावामध्ये कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचे वतीने श्री. तातोबा काळू ठमके यांचे शेतावर 0.40 हे क्षेत्रावर सलग आंबा फळबाग लागवड मा. गणेश लव्हे प्र. तहसीलदार शाहुवाडी यांचे हस्ते फळबाग लागवड करण्यात आली. यावेळी लव्हे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना म. गांधी रोजगार हमी योजनेतुन सलग व शेताच्या बांधावर जास्तीत फळबाग लागवड,करून शाश्वत उत्पन्न वाढवावे, व प्रगती करावी असे मार्गदर्शन केले. नीलम चाकणे, तालुका कृषि अधिकारी यांनी फळबाग योजने सोबत जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलतारा खड्डे, त्याचबरोबर गांडूळ खत युनिट, नाडेप युनिट, सारख्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आव्हान केले. मंडळ कृषि अधिकारी,बांबवडे अशोक कोळेकर यांनी मनरेगा योजनेची माहिती दिली. यावेळी रुपेश पाटील उप कृषि अधिकारी बांबवडे, मंडळ मधील सर्व सहायक कृषि अधिकारी उपस्थित होते

अधिक माहिती...
12
Jun 25
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मोजे टक्केवारी येथे अरुण शामराव पाटील यांच्या प्रक्षेत्रावर काजू फळबागेची आखणी करून दिली

केवळ येथे अरुण शामराव पाटील यांच्या पक्षत्रावर अरुण शामराव पाटील यांना काजू फळबागेचे आखणी करून दिली सोबत सहायक कृषी अधिकारी काजल मर्दानी मॅडम मंडल कृषी अधिकारी सुनील डवरी व इतर शेतकरी टिकेवाडी

अधिक माहिती...