उपक्रम : इतर उपक्रम
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माननीय नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब पालकमंत्री कोल्हापूर तथा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवा तालुका राधानगरी येथे सर्व रोग निदान शिबिर.
गटविकास अधिकारी राधानगरी राधानगरी 19 August 2025
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत माननीय नामदार प्रकाशरावजी आबिटकर साहेब पालकमंत्री कोल्हापूर तथा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवा तालुका राधानगरी येथे सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन माननीय प्रकाशरावजी आबिटकर साहेब पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय एस. कार्तिकेन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर, माननीय दिलीप माने साहेब संचालक कोल्हापूर, माननीय डॉ. वाडीकर साहेब , जिल्हा शल्य चिकिस्तक, कोल्हापूर , माननीय डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी, माननीय डॉक्टर आर.आर.शेट्ये साहेब तालुका आरोग्य अधिकारी राधानगरी, सौ, वनिता पाटील सरपंच वाळवा उपस्थित होते. या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर आमंत्रित केले आहेत. या. शिबिरामध्ये दिनांक 15/ 8/ 25 ते 19 /8/ 25 पर्यंत 2568 लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये हृदयरोग , इसीजी, त्वचारोग, दंतरोग, 2D इको, अवयव दान, वयोवंदना कार्ड, नेत्ररोग, कान, नाक ,घसा, सोनोग्राफी, आर्थोपेडिक, स्त्रीरोग इत्यादी सेवेचा लाभ लोकांनी घेतला.