संपन्न झालेले उपक्रम

19
Aug 25
संस्कार शिबीर अंतर्गत राखी तयार करणे

ए पी मगदूम हायस्कूल माणगाव येथे संस्कार शिबीर अंतर्गत मुलांना राखी तयार करणे कार्यशाळा आयोजित करणेत आली सदर राखी तयार करून त्या जवानांना पाठवनेत आल्या

अधिक माहिती...
15
Aug 25
जल जीवन मिशन अंतर्गत चंदूर नळ पाणी पुरवठा योजना ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

१. योजनेची मंजूर किंमत : रु. २१,८७,८५,९८५/- २. प्रशासकीय मंजुरीचा दिनांक : दि. १४/१०/२०२२ ३. तांत्रिक मान्यता दिनांक : दि. ०४/१०/२०२२ ४. शासकीय अनुदान : केंद्र हिस्सा ५०% & राज्य हिस्सा ५०% ५. ठेकेदाराचे नाव : मे. रचना इंजिनियर्स, कोल्हापूर ६. कार्यादेश दिनांक : दि. १४/१२/२०२२ ७. निविदेतील कामाची किंमत : रु. १३,५४,४२,७२० /- ८. स्वीकृत निविदेची किंमत : रु. १३,८१,५१,५७४/- (२.०० % जादा दराने) ९. कंत्राटदाराचे नाव : मे. रचना इंजिनियर्स, कोल्हापूर १०. कार्यादेशाचा क्रमांक : २६९६/२०२२ दि. १४/१२/२०२२ ११. स्वीकृत निविदेनुसार कामाची मुदत : २५ महीने १२. काम पूर्ण करण्याचा दिनांक : दि. १३/०१/२०२५ १३. स्वीकृत निविदेचा क्रमांक : बी-१/सस/कोल्हापूर/१६ सन २०२२-२३

अधिक माहिती...
5
Aug 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रोगनिदान शिबिर (ग्रामीण रुग्णालय, चंदगड)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, चंदगड, तालुका चंदगड येथे दिनांक ०२/०८/२०२५ रोजी वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी मधून संदर्भित केलेल्या मुलांसाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरास एकूण १३ लाभार्थी उपस्थित होते. या मध्ये PHIMOSIS- १0, Murmur-2 व Cyst -१ या मुलांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजेंद्र पाटील (बालरोग तज्ञ ) म्हणून उपस्थित होते.

अधिक माहिती...
4
Aug 25
ग्रह भेट

आयसीडीएस पन्हाळा बोर पाडळे बीट एक मोहरे अंगणवाडी क्रमांक 19

अधिक माहिती...
4
Aug 25
मौजे बिद्री येथील पाणंद रस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली

राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "महसूल सप्ताह २०१५" साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून, "पाणंद / शिव रस्त्यांची मोजणी व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड " बाबत विशेष उपक्रम राबविणेबाबत नमूद केलेले आहे. त्या अंतर्गत मौजे बिद्री येथील पाणंद रस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली

अधिक माहिती...
4
Aug 25
मौजे बाचणी येथील मंगोबा पाणंद रस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली

राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत "महसूल सप्ताह २०१५" साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून, "पाणंद / शिव रस्त्यांची मोजणी व त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड " बाबत विशेष उपक्रम राबविणेबाबत नमूद केलेले आहे. त्या अंतर्गत मौजे बाचणी येथील मंगोबा पाणंद रस्ता खुला करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली

अधिक माहिती...