1. उपक्रम पोर्टलवर अपलोड करत असताना आपल्या विभागाला देण्यात आलेल्या उपक्रमाच्या उदिदष्ट पूर्ततेचा उपक्रमनिहाय तालुक्याचा एकत्रित अहवाल अपलोड केला जाईल याची दक्षता घ्यावी. उदा. आयुष्यमान भारत कार्ड वितरीत करणे असा उपक्रम असेल तर तालुक्यातील एकूण साध्य उदिदष्ट, उपक्रमांतर्गत विशेष शिबीरांचे फोटो, शिबीराच्या प्रचार - प्रसिध्दीच्या बातम्या, लाभार्थ्यी यादी या बाबी पोर्टलवर अपलोड करणे अपेक्षित आहे. कोणत्याही परिस्थितीत गावनिहाय उपक्रम अपलोड करु नयेत.
2. विविध उपक्रमांतर्गत लाभ देणेत आलेल्या लाभार्थ्यांची यादी पोर्टलवरील लाभार्थ्यी यादी हा टॅब वापरुन खालील नमुन्यात अपलोड करावी.
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान, कोल्हापूर
उपक्रमाचा तपशील
विभाग
तालुका
अ.क्र. लाभार्थ्यांचे नाव कमांक गाव तालुका संपर्क क्रमांक
3. जिल्हास्तरीय कार्यालयांनी उपक्रम प्रमाणित करताना तालुकास्तरावरील कार्यालयांनी भरलेली माहिती, फोटो, बातम्या, लाभार्थ्यी यादी अचूक असल्याची खात्री करुन प्रमाणीकरण करावे. एका उपक्रमाचा संपूर्ण तालुक्याचा एकच अहवाल पोर्टलवर अपलोड होईल याची दक्षता घेऊन प्रमाणीकरण करावे.
4. अभियानातील उपक्रमांची अंमलबजावणी करत असताना तयार करणेत आलेल्या यूटयूब लिंक, व्हिडीओ पोर्टलवर योग्य माहितीसह अपलोड करावेत.
5. याबाबत काही शंका अथवा तांत्रिक अडचण असलेस खालील क्रमांकावर संपर्क करणेत यावा.
श्री.प्रशांत नलवडे मो.नं. 9975867463
श्री.सचिन खराडे मो.नं. 9271679793