27
Jun 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर द्वारे 27 जून 2025 रोजी राष्ट्रीय सूक्ष्म लघू मध्यम उद्योग दिनाच्या निमित्ताने महेश क्लब ऑफ इचलकरंजी, विकासनगर, इचलकरंजी, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूरचे व्यवस्थापक श्री. विकास कुलकर्णी यांनी उपस्थित टेक्सटाइल उद्योजकांना उद्योग विभागाच्या मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम व सामूहिक प्रोत्साहन योजना याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात 100 उद्योजकांनी सहभाग नोंदवला.