11
Jul 25
मधाचे गांव दाजीपूर/ओलवण् घोषित करणे बाबत…

मधाचे गांव दाजीपूर/ओलवण या प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करणेचे काम सुरू असून त्या अनुषंगाने दिनांक 11/07/2025 रोजी मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचे दुसरे गांव दाजीपूर (ओलवण) जिल्हा सनियंत्रण समितीची सभा झाली. सदर योजनेची अंमलबजावणी करीत असताना माहिती व प्रशिक्षण दालनच्या इमारतीचा दुरूस्तीचा कामास रूपये 13.55 लाख इतका निधी आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार या कामी फक्त 05.00 लाख रूपयाची तरतूद करणेत आली आहे. कमी पडणारा निधी रूपये 08.55 लाख हा जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव देऊन मागणी करणेत यावा असे दिनांक 11/07/2025 रोजीच्या बैठकीत निश्चित करणेत आले. त्यानुसार सदर निधी मागणी करीता दिनांक 21/07/2025 रोजी जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर यांचेकडे सविस्तर प्रस्ताव सादर करणेत आला असून त्यास प्रशासकीय मान्यता मिळताच तांत्रिक मान्यता करीता जिल्हा परिषद कोल्हापूर यांचेकडे सादर करणेचे नियोजीत आहे. तांत्रिक मान्यता मिळाले नंतर यापूर्वी आमचे मंडळाचे मुख्य कार्यालयाकडे सादर करणेत आलेल्या प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता या प्रस्तावाव्दारे पुर्ण करणेत येईल व त्यानंतर राज्य शासनाकडून या संपूर्ण प्रस्तावास मान्यता मिळालेनंतर दाजीपूर/ओलवण हे मधाचे गांव म्हणून घोषित करणेची कार्यवाही सुरू करणेत येईल.

अधिक माहिती...