24
Jun 25
हातकणंगले तालुका क्रीडा संकुल जागेबाबत बैठक आयोजन

मुंबई येथे मंत्रालयाच्या दालनामध्ये क्रीडामंत्री, मा नामदार दत्ता मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव, हातकणंगले व हुपरी येथे क्रीडा संकुल मंजुरीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन लवकरात लवकर क्रीडा संकुल मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा मंत्री महोदयांनी यावेळी दिले.

अधिक माहिती...
23
Jun 25
तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित करणेबाबत - मा. ना. प्रकाश आबिटकर, मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली आजरा, राधानगरी व भुदरगड तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

तालुका क्रीडा संकुल कार्यान्वित करणे करिता मा पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आजरा राधानगरी व भुदरगड तालुक्यांची तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये तालुका क्रीडा संकुल ला मध्ये नव्याने उभारणी करावयाच्या क्रीडा सुविधांची निर्मिती करण्यासाठी वास्तु विशारद नियुक्ती तसेच क्रीडा संकुल कार्यान्वित करणे याबाबत चर्चा झाली. आगामी काळात होणाऱ्या तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर होण्याकरिता नियोजन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सोबत संकुल समितीच्या बैठकीतील फोटो व आजरा येथील संकुलाच्या मैदानाचा फोटो.

अधिक माहिती...