1
May 25
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या कार्यालयाच्या अखत्यारीत एक जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा व चार उपविभागीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. सदर प्रयोगशाळा ह्या (1) कोल्हापूर, (2) गडहिंग्लज (ता. गडहिंग्लज), (3) कोडोली (ता. पन्हाळा), (4) शिरोळ (ता. शिरोळ) व (5)सोळांकूर (ता. राधानगरी) या ठिकाणी कार्यरत आहेत.
जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा.व स्व.) अधिनस्त तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय कर्मचारी यांचेद्वारा गावांतील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवांचे पाण्याचे नमुने संकलित करणेत येतात.सदरील नमुन्याना जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनांनुसार UNIQUE सांकेतांक क्रमांक दिला जातो व त्याची नोंद Water Quality Management Information System या केंद्र-शासनाच्या संकेतस्थळावर करणेत येते. सदरील सांकेतांकानुसार पाण्याचे नमुने विविध प्रयोगशाळांमध्ये तपासणी करणेत येतात.
प्रयोगशाळांचे कार्यक्षेत्र-
1 प्रयोगशाळेचे नाव : जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा स्थळ : सार्वजनिक बांधकाम विभागाशेजारी, ताराबाई पार्क, कोल्हापूर प्रयोगशाळेस जोडलेले तालुके : करवीर, गगनबावडा, पन्हाळा (भाग), हातकणंगले (भाग)
2 प्रयोगशाळेचे नाव : उपविभागीय प्रयोगशाळा गडहिंग्लज स्थळ : क्वार्टर नं. 11,पोलीस क्वार्टर्सशेजारी, गडहिंग्लज. ता.- गडहिंग्लज प्रयोगशाळेस जोडलेले तालुके : आजरा, चंदगड, गडहिंग्लज
3 प्रयोगशाळेचे नाव : उपविभागीय प्रयोगशाळा कोडोली स्थळ : उपजिल्हा रुग्णालय,कोडोली, ता.-पन्हाळा प्रयोगशाळेस जोडलेले तालुके : पन्हाळा (भाग), हातकणंगले (भाग), शाहूवाडी
4 प्रयोगशाळेचे नाव : उपविभागीय प्रयोगशाळा शिरोळ स्थळ : मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, शिरोळ ता.-शिरोळ प्रयोगशाळेस जोडलेले तालुके : हातकणंगले (भाग), शिरोळ
5 प्रयोगशाळेचे नाव : उपविभागीय प्रयोगशाळा सोळांकूर स्थळ : घर नं. 454, वि.वि. पाटील घर पहिला मजला, सोळांकूर. ता.- राधानगरी. प्रयोगशाळेस जोडलेले तालुके : राधानगरी, कागल, भूदरगड
प्राप्त झालेल्या पाणी नमुन्यांची 15 रासायनिक घटक व 2 जैविक घटकांकरिता तपासणी ही रसायनी/अणुजैविकतज्ञ यांचेमार्फत करणेत येते.तपासणी करणेत आलेल्या पाणी नमुन्यांचे अहवाल हे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष, गट विकास अधिकारी (सर्व), तालुका आरोग्य अधिकारी (सर्व), संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रे, संबंधित ग्रामपंचायती यांना पुरविणेत येतात. तसेच सदर पाणी नमुन्यांचे अहवाल केंद्र-शासनाच्या Water Quality Management Information System या संकेतस्थळावर प्रयोगशाळांच्या कर्मचा-यांकडून नोंदविणेत येतात.
अणुजैविक तपासणीमध्ये अयोग्य आलेले पाणी नमुने योग्य क्लोरीनेशन करून पुर्नतपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेमध्ये प्राप्त होतात व तपासणी अंती अशा प्रकारच्या पाणी नमुन्याची गुणवत्ता योग्य असल्याबाबतची खात्री करणेत येते व त्याबाबतचा अहवाल संबंधित यंत्रणांना पाठविणेत येतो.
त्याचप्रमाणे, खाजगी पाणी नमुन्यांची तपासणी करण्याची सुविधाही सर्व प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे. त्या कामी शासनाने ठरवून दिलेले माफक शुल्क आकारले जातात. रासायनिक तपासणीसाठी एकूण रु.400 /- व अणुजैविक तपासणीसाठी एकूण रु.200 /- इतके शुल्क आकारण्यात येतात.