22
Jul 25
मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे
ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून "शहरातील Garbage Vurnerable Points शोधून त्यांचे सौंदर्यीकरण करणे " हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे.
जयसिंगपूर नगरपरिषदेच्यावतीने जयसिंगपूर शहरामध्ये ६ ठिकाणी Garbage Vurnerable Points चे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
१) नांदणी रोड शाळा नं. २
२)नांदणी रोड शाहूनगर
३)राजीवगांधी नगर शाळा
४)सिद्धेश्वर हॉल शेजारी
५)राजर्षी शाहू स्टेडियम मागील बाजूस
६)रेल्वे स्टेशन रोड लगत बायोगॅस प्रकल्प समोरील बाजूस