9
Jul 25
मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " एकल वापर प्लास्टिक बंदी अभियान प्रभावीपणे राबवणे " हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे.
जयसिंगपूर शहरामध्ये एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर करणे ,विक्री करणे प्रतिबंध करण्यात आला आहे . रहिवासी क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्र ,पर्यटन क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र येथे पथनाट्य जनजागृती करून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. दिनांक 1 मे 2025 ते 8 जुलै 2025 पर्यंत 118 आस्थापनाची तपासणी करण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत आजपर्यंत २४५००/- दंड व ३६.५० किलो प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे .