22
Jul 25
मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " प्रत्येक नगरपालिका कार्यक्षेत्रात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारणे " हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद निर्माण व्हावा, त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने जयसिंगपूर नगरपरिषद विविध उपाययोजना करत आहे.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषद क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी १ विरंगुळा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
जयसिंगपूर नगरपरिषद मालकीची जागा असलेल्या जयसिंगपूर नगरपरिषद वाचनालय येथे विरंगुळा केंद्र स्थापन करणेत आले आहे.
विरंगुळ्याचीही साधने - यात आराम खुर्ची , कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, ल्युडो, इनडोअर गेम्स, , वर्तमान पत्रे, विविध पुस्तके आदी उपलब्ध केली आहेत.