31
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत कार्यवाही

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 - BLC घटकाअंतर्गत एकूण ३५ घरकुलांचा DPR क्र. 2 प्रस्ताव सादर करणेतआलेला आहे. AHP घटकाअंतर्गत एकूण 413 घरकुलांचा DPR मंजूरी करिता प्रस्ताव सादर करणेत आलेला आहे. BLC घटकाअंतर्गत एकूण २२५ अर्ज ऑनलाइन नोंदणी करणेत आलेले आहेत. तसेच AHP घटकाअंतर्गत एकूण ४५७ अर्ज ऑनलाइन नोंदणी करणेत आलेले आहेत.

अधिक माहिती...
29
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत अंमलबजावणी करणे बाबत

माननीय पालकमंत्री प्रकाश आबिटकर सो यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०१/०५/२०२५ ते दिनांक १५/०८/२०२५ या कालावधीत राबविण्यात येत असल्याने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत नगरपंचायत चंदगड यांच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० अंतर्गत इच्छुक अर्जदार यांचे मार्फत ऑनलाईन पद्धतीने https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या वेबसाईट द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. आजपर्यंत 51 इतक्या अर्जदारांचे अर्ज प्राप्त झाले असून छाननी अंती 12 अर्जदारांचे अर्ज मंजुरी करिताचा डीपीआर तयार करून शासनास मंजुरी करता सादर करण्यात आलेला आहे. तसेच सदर योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेणे करिता नागरिकांना नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात आलेले आहे.

अधिक माहिती...
24
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान

हातकणंगले शहरामध्ये आज रोजी प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात आले. सदर अभियानातर्गत शहरामधील एकूण 03 लाभार्थी यांचे नोंदणी करण्यात आली.

अधिक माहिती...
10
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे.

मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थ्या नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे." हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी 1.0 अंतर्गत एकूण 119 घरकुले मंजूर आहेत त्यापैकी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान कालावधीत १० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून पूर्ण झालेल्या घरकुलांना व लाभार्थ्यांना भेट देऊन जनजागृतीसाठी आवाहन केले व तसेच 2.0 साठी ऑनलाईन नोंदणी अभियान १४/०७/२०२५ ते ३१/०७/२०२५ जयसिंगपूर नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे आयोजित केले आहे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कालावधी दरम्यान आज अखेर 103 नोंदणी झाल्या आहेत तसेच प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 च्या १८/०६/२०२५ रोजी झालेल्या . CSMC बैठकीमध्ये जयसिंगपूर नगरपरिषदेतील 41 लाभार्थ्यांचा DPR 1 मंजूर झाला असून 12/07/2025 रोजी मा. श्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांच्या हस्ते मंजूर ४१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले गेले व जनजागृतीसाठी सोशल मीडिया द्वारे व्हिडिओग्राफी प्रसिद्ध केली.

अधिक माहिती...
10
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजना मंजूर बांधकामे पूर्ण करणे.PMAY 2.0 ची जनजागृती करणे.

मुरगूड नगरपरिषद,मुरगूड सन २०२५-२०२६ मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत PMAY 2.0 मध्ये BLC घटक क्रमांक ४ अंतर्गत एकूण ५३ अर्ज प्राप्त असून त्यापैकी छाननी करून पहिला DPR क्रमांक १- पात्र ३९ लाभार्थीचा मंजुरीसाठी SLMC साठी दाखल करण्यात आला आहे. तसेच AHP अंतर्गत - ८६ लाभार्ती यांचे अर्ज आले असून त्यांची छाननी सुरु आहे असे एकूण १३९ अर्ज प्राप्त झाले आहेत.तसेच PMAY 2.0 ची जनजागृती करण्यासाठी घंटा गाडी वरून announcement केली जात आहे, नागरिकाच्या माहितीस्तव डिजिटल फलक लावण्यात आलेला आहे,डिजिटल स्क्रीन वर अँड दिली आहे तसेच PMAY 2.0 ची माहिती पुण्यनगरी दैनिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिक माहिती...
3
Jul 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY 2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे.

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत जाहिर प्रसिद्धी घंटागाडी/सोशलमिडिया द्वारे करनेत आली आहे या अंतर्गत 200 लाभार्थी नोंदणी करून पुढील कार्यवाही सुरु आहे

अधिक माहिती...
30
Jun 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकाम पूर्ण करणे PMAY 2.0 अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवणे

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कालावधीत प्रधानमंत्री आवास योजने अतंर्गत 9 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे.तसेच PMAY 2.0 अंतर्गत 150 नविन लाभार्थ्यांची नोंदणी करणेत आलेली आहे. तसेच PMAY 2.0 अंतर्गत 18 लाभार्थ्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर करणेत आला होता त्यास मंजूरी प्राप्त झाली आहे.अभियान कालावधीत अपूर्ण घरे पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी वेळोवेळी साईट visit देवून अपूर्ण घरे पूर्ण करणेबाबत संबंधिताना सूचना दिल्या तसेच त्यांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करून घर पूर्ण करणेस प्रोत्साहित केले.अभियान कालावधीत PMAY २.० लाभार्थी नोंदणी करणे करिता 1. PMAY २.० जनजागृती करिता सदर योजनेचे माहिती फलक तयार करून शहराच्या विविध ठिकाणी लावणेत आले आहेत.२. घरोघरी जावून हेंडबिल देवून जनजागृती केली. ३. जनजागृतीपर जिंगल तयार करून घंटागाडी द्वारे प्रबोधन केले. ४. शहरातील Digital display स्क्रीन वर योजनेची माहिती प्रदर्शित करणेत आली आहे.

अधिक माहिती...
10
Jun 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY 2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थ्यी नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविणे

कागल नगरपरिषद प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे व नवीन लाभार्थी नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवणे साठी प्रयत्नशील आहे. दिनांक 30/05/2025 अखेर 53 नवीन लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून 13 घरांची बांधकामे सुरू आहेत.

अधिक माहिती...
30
May 25
वडगांव नगरपरिषद, वडगांव मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 नोंदणी अभियान

वडगांव नगरपरिषद मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 या योजनेची अंमलबजावणी सुरू करणेत आली असून शाळा, संस्था, वर्तमानपत्रे, शासकीय, निम-शासकीय कार्यालये, कँप, मेळावे, शिबिरे, कार्यशाळा, गृह-भेटी, सोशल मिडिया, विविध कार्यक्रम/उपक्रम राबविणेत आले असून जनजागृती करणेत आली आहे. त्यानुसार वडगांव नगरपरिषदकडील Beneficiary Led Construction (BLC) या घटकाअंतर्गत एकूण 185 अर्ज प्राप्त असून त्यापैकी पात्र 167 लाभार्थीचे एकूण 2 सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र शासनाकडे मंजूरी करिता सादर करणेत आले आहेत. तसेच Affordable Housing Project (AHP) घटकाअंतर्गत वडगांव नगरपरिषदकडे एकूण 446 अर्ज प्राप्त असून पात्र 413 लाभार्थीकरिता वडगांव न.प. मालकीच्या गट नं. 173/1/अ येथील 10700 चौ.मी. इतक्या जागवेर नियोजित गृहप्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) केंद्र शासनाकडे मंजूरी करिता सादर करणेबाबत कार्यवाही जलदगतीने सुरू आहे.

अधिक माहिती...
20
May 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे. PMAY 2.0 च्या अंतर्गत नवीन लाभार्थी नोंदणी अभियान

हुपरी शहरातील नागरिकांसाठी सोशल मिडिया ,लोकल केबल नेटवर्क द्वारे जाहीर आवाहन करून PMAY2.0 लाभार्थी नोंदणी मेळावे घेणेत आले आहेत

अधिक माहिती...
2
May 25
प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व मंजूर बांधकामे पूर्ण करणे

सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून वडगांव नगरपरिषद, वडगांव मार्फत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेची अंमलबजावणी सुरू करणेत आली. या योजनेतील एकूण 4 घटकांपैकी घटक क्र. 2 : कर्ज संलग्न व्याज अनुदान हा घटक बँकेमार्फत राबविणेत येत असून या घटकाअंतर्गत वडगांव नगरपरिषद हद्दीतील एकूण 130 लाभार्थींना लाभ मिळालेला आहे. घटक क्र. 4 : आर्थिकदृष्या दुर्बल गटातील (EWS) लाभार्थींना स्वमालकीच्या जागेवर वैयक्तिक स्वरुपात नवीन घरकुल बांधकाम करणेसकरिता 2.50 लक्ष रू. अनुदान (केंद्र शासन हिस्सा - 1.50 लक्ष रू. अनुदान + राज्य शासन हिस्सा - 1.00 लक्ष रू. अनुदान) या Beneficiary Led Construction (BLC) घटकाअंतर्गत वडगांव नगरपरिषदकडील माहिती पुढीलप्रमाणे - : प्रआयो (शहरी) अंतर्गत BLC घटकाअंतर्गत एकूण 6 DPR अन्वये एकूण 284 घरकुले मंजूर असून सर्वच्या सर्व 284 घरकुले 100% पूर्ण करणेत आलेली आहेत, तसेच एकूण प्राप्त 709.40 लक्ष रू. निधीपैकी सर्वच्या सर्व 709.40 लक्ष रू. निधी हा 100% खर्च करणेत आलेला आहे.

अधिक माहिती...