22
Jul 25
मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये सुयोग्य वाहन पार्किग व्यवस्था तयार करणे. " हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे.
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदचे राजर्षी शाहू स्टेडीयम येथे २५ चारचाकी वाहने व ७० दुचाकी वाहने यांचेसाठी नि:शुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच रस्त्याच्या कडेला सायकल ट्रॅक इ.तयार करण्यात आले आहेत.