11
Jun 25
मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे.
सदर अभियान अंतर्गत चंदगड नगरपंचायतीस एकूण ८ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून चंदगड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शहरात कायदा सुव्यवस्था राखणे कामे शहरास तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज बनविण्याच्या उद्देशाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, मांडदेव चौक, रामदेव गल्ली चौक, रवळनाथ मंदिर चौक, बाजारपेठ परिसर, नगरपंचायत चौक, बस थांबे, कोर्ट चौक इत्यादी विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम जिल्हा वार्षिक योजना सन २०२५- २६ अंतर्गत प्रस्तावित आहे. तसेच सद्यस्थितीत नगरपंचायत चौक येथे एक, नगरपंचायत चंदगड अग्निशमन व आणीबाणी केंद्र येथे सहा असे एकूण सात सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत.