16
Jul 25
सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

मा.ना.प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या नावाने कृती कार्यक्रम राबविणेत आहे.या अंतर्गत लोक कल्याणकारी शासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणणेसाठी प्रभावी उपक्रम राबविणेत येत आहे.याबाबत नगरपालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे सहकार्याने करणेत आली.

अधिक माहिती...
8
Jul 25
सफाईगार कर्मचा-यांची आरोग्य तपासणी

पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद, पन्हाळा यांच्या वतीने दि.०८/०७/२०२५ रोजी‌ स्वच्छ भारत अभियान २.० व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत तसेच मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान सन २०२५ अंतर्भूत “नगरपालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे” या घटकाअंतर्गत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील कार्यरत सफाईगार कर्मचा-यांची प्रशिक्षित आरोग्य सेवकांकडून प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. याचबरोबर आयुष्यमान भारत, आभा कार्ड अशा सामाजिक सुरक्षा योजनाबद्दल माहिती देण्यात आली.

अधिक माहिती...
7
Jul 25
नगरपरिषदकडे कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

मा.ना. श्री. प्रकाश आबिटकर, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रम (मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दि. १ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत राबविणेत येत आहे. सदर अभियान अंतर्गत जयसिंगपूर नगरपरिषदेस एकूण ९ उपक्रम राबविणेबाबत सुचित करणेत आले असून " नगर पालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपब्लध करुन देणे." हा उपक्रम नगरपरिषद कार्यक्षेत्रात सदर अभियान कालावधीत राबविणेत येत आहे. जयसिंगपूर नगरपरिषदकडे कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी यांची दि ३० मे २०२५ व ०७/०७/२०२५ या रोजी आरोग्य तपासणी करणेत आली आहे. ५९ कायम सफाई कर्मचारी व ११६ कंत्राटी सफाई कर्मचारी असे एकुण १७५ सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करणेत आली आहे.

अधिक माहिती...
3
Jul 25
सफाई कमर्चारी यांना साहित्य

मुरगूड नगरपरिषद,मुरगूड सन २०२५-२०२६ दिनांक ०३/०७/२०२५ रोजी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत आस्थापनेवरील २८ कर्मचार्यांना रेनकोट,खोरी,पाटी,खुरपी,गमबूट,ग्लोज,मास्क मा.मुख्याधिकारी मा.श्री.अतिश वाळूंज,कार्यालयीन अधीक्षक श्रीमती.स्नेहल नरके, स्वच्छता निरीक्षक श्री.सचिन भोसले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहेत.

अधिक माहिती...
25
Jun 25
नगरपंचायतकडील सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

हातकणंगले नगरपंचायत कडे सद्यस्थितीत एकूण १० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. सदर सर्व सफाई कर्मचारी यांची दिनांक २५/०६/२०२५ रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली.

अधिक माहिती...
24
Jun 25
नगरपरिषदेकडील सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करणे व सुविधा उपलब्ध करुन देणे.

* न.प. आस्थापनेवरील सफाई कर्मचारी - 58 *अभियान कालावधीतील तपासणीचा दिनांक - दिनांक २४/०६/२०२५ रोजी न.पा. आस्थापनेवरीलसफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी झाली आहे. * आरोग्य तपासणीबाबत केलेल्या कार्यवाहिचा तपशिल- आरोग्य तपासणी मध्ये कर्मचारी यांचे रक्त तपासणी, ECG तपासणी, BP, शुगर तपासणी, इत्यादी तपासणी केल्या आहेत. * आरोग्य तपासणीअंती उपलब्ध करून दिलेल्या वैद्यकीय सुविधांचा तपशिल - आरोग्य तपासणीअंती ज्या कर्मचारी यांनी टी.टी ची लस घेतली नाही त्यांना टी टी ची लस देण्यात आली. तसेच कर्मचारी यांना आवश्यकते प्रमाणे गोळ्या व औषधे देण्यात आली आहेत. * सुरक्षा उपकरणे ( PPE KIT) पुरवठा केलेचा तपशील - सफाई कर्मचारी यांना मास्क, गमबूट, हँण्डग्लोज, रेनकोट इत्यादी सुरक्षा उपकरणे पुरवठा केलेली आहेत.

अधिक माहिती...
13
Jun 25
नगरपालिके कडील कार्यरत असणाऱ्या सर्व सफाई कामगारांचे आरोग्य तपासणी करणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बाबत

मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 01/ 05/2025 ते 15/08/2025 या कालावधीत श्री प्रकाश आबीटकर सौ.पालकमंत्री कोल्हापूर यांच्या सौजन्याने राबविण्यात येत आहे. याअभियानां अतर्गत चंदगड नगरपंचायत कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. दिनांक 13/07:25 रोजी चंदगड नगरपंचायत कार्यालयातील आरोग्य विभागाकडील मुकादम व ग्रा.प कालीन समावेशित 11 सफाई कर्मचारी अशा एकूण 12 कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे करण्यात आले आहे आरोग्य तपासणी मध्ये सफाई कर्मचारी यांचे रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी व आवश्यकतेनुसार धनुर्वादाचे इंजेक्शन इत्यादी तपासणी व उपचार करण्यात आली. रक्त तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पुढील उपचार मा. वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय यांचे निर्देशनानुसार करण्यात येतील सर्व सफाई कर्मचारी यांना मागील महिना दिनांक 27/05 /2025 रोजी मास्क देण्यात आले होते त्यांचे पुढील आरोग्य तपासणी तीन महिन्यानंतर करण्यात येईल.

अधिक माहिती...
10
Jun 25
नगरपरिषद आस्थापना विभागाकडील सर्व सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचार्याची आरोग्य तपासणी करण्यात आली.

नगरपरिषद आस्थापना विभागाकडील सर्व सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली.सदर आरोग्य तपासणी मध्ये सर्व आस्थापना व कंत्राटी कर्मचाऱ्याची यांची ECG,ब्लड,युरीन, BP तपासणी करण्यात आली.

अधिक माहिती...
6
Jun 25
नगरपालिकेकडे कार्यरत असणा-या सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी कॅम्प बाबत

कागल नगरपरिषद कागल कडील सर्व सफाई कर्मचारी (४५ स्थायी व 110 ठेका कर्मचारी) यांचे सहा महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी घेणेत येते. दिनांक 6 जून 2025 रोजी 155 सफाई कर्मचारी यांची नगरपरिषद व किर्लोस्कर कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने छ.शाहू वाचनालय, कागल येथे आरोग्य तपासणी करणेत आली. सदर तपासणी मध्ये सर्व कर्मचारी यांची रक्त तपासणी, रक्तदाब तपासणी, शुगर लेव्हल तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. आरोग्यविषयक काळजी घेणेबाबत सर्व कर्मचारी यांना डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.

अधिक माहिती...
21
May 25
नपकडील सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी बाबत

दि.२१/०५/२०२५ रोजी आरोग्य तपासणी करण्यात अअली आहे

अधिक माहिती...
13
May 25
सफाई मित्र आरोग्य तपासणी

मलकापूर नगरपरिषदकडे कार्यरत १८ पर्मनंट सफाई मित्र व १६ ठेका कर्मचारी सफाई मित्र यांची आरोग्य तपासणी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल, खुटाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली.

अधिक माहिती...
24
Sep 24
हातकणंगले नगरपंचायतकडील आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

हातकणंगले नगरपंचायतकडील आरोग्य विभागाकडील कार्यरत असणारे कर्मचारी तसेच बाह्य यंत्रणेद्वारे काम करणाऱ्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामपंचायत कालीन ०९ सफाई कर्मचारी व बाह्य यंत्रणेवरील २८ कर्मचारी यांचे ग्रामीण रूग्णालयामार्फत तपासणी करण्यात आली.

अधिक माहिती...