15
Jul 25
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत दि.१ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात १०० दिवस प्राधान्य कृती कार्यक्रमांचे निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणाऱ्या शहरातील स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणे बाबतचा उपक्रम राबविण्याचे निर्देश शासन स्तरावरून देण्यात आलेले आहेत. या उपक्रमांतर्गत
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्कालीन परिस्थिती मध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणाऱ्या जवळपास ४०० स्वयंसेवकांसाठी आज मंगळवार दि.१५ जुलै रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामग्रीची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित आवश्यक बाबींचे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी देवुन उपस्थित स्वयंसेवकांच्या शंका- कुशंकांचे निराकरण करणेत आले. याप्रसंगी महानगरपालिका अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार , डि.के.ए.एस.सी काॅलेजचे विनायक भोई सर,शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे हायस्कूलचे मुल्लाणी सर , गोविंदराव हायस्कूलचे राहुल बुनांद्रे, B.S.यादव ॲकॅडमीचे यादव सर, माणूसकी फाऊंडेशनचे रमल आमणे सर, पोलिस बॉईज असोसिएशनचे सतिश चव्हाण, वीर रेस्क्यु फोर्सचे रूपेश खरवार, ए.जे.फाऊंडेशनचे अबोली जीगजिनी मॅडम याचबरोबर मेकॅनिक अनिल कांबळे यांचेसह
महापालिकेचे अग्निशमन दला कडील फायर जवान यांच्यासह वरील सर्व शाळा, महाविद्यालयाचे आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.