19
Jul 25
आजऱ्यातील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पारंपरिक बांबूच्या उत्पादनाची बेसलाईन तयार करून पुढील पाच वर्षांपर्यंत शास्त्रीय पद्धतीने बांबू लागवड, बांबूवरील उपचार उपक्रम आणि मूल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. जास्तीत जास्त बांबूची उत्पादकता वाढविण्यासाठी जैवतंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. - यासाठी डॉ. प्रमोदकुमार, कार्यकारी संचालक, सामाजिक आणि आर्थिक बदल संस्था, बंगळूर यांनी सविस्तर माहिती दिली.
पारंपरिक बांबूची उत्पादकता वाढविण्यासाठी
आणि शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने बांबू लागवड आणि मूल्यवर्धनासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.