1
Aug 25
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामार्फत अंगणवाडी विभागाने लोकाभिमुख उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत आजरा पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उंचीनुसार तीव्र व मध्यम, कमी वजनाच्या बालकांना दत्तक घेतले आहे. त्यांच्या पालकांना बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यकांत नाईक, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, रवींद्र जरळी पर्यवेक्षिका मनीषा कांबळे, लतिका देसाई, लता केसरकर, मीना नागरगोजे, शुभांगी पोवार, गीता माजगावकर तसेच पंचायत समितीचे अन्य वरिष्ठ अधिकारी यांनी कमी वजनाच्या बालकांना दत्तक घेतले आहे. अधिकारी दत्तक बालकांच्या घरी भेट देत आहेत. बालकांच्या आई-वडिलांशी संवाद साधून बालकांच्या आरोग्यवाढीसाठी मार्गदर्शन करत आहेत. यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक , रवींद्र जरळी आणि अंगणवाडी सेविकांनी मोलाची भूमिका घेतली आहे.
स्वखर्चातून फूड बास्केटचे वाटप : दत्तक पालक अधिकाऱ्यांनी केवळ
मार्गदर्शनच नाही तर स्वखर्चातून दत्तक बालकांना फूड बास्केटही दिले आहेत. बास्केटमध्ये अंडी, बटाटे, गूळ, शेंगदाणे, खजूर, काळे मनुके, राजगिरा लाडू यांसह बाळाच्या पोषणासाठी आवश्यक पदार्थ आहेत.