21
Jun 25
२१ जून २०२५ रोजी गारगोटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक थीम ठरविली जाते या वर्षी “ Yoga for One Earth, One Health” (“ एक पृथ्वी एक स्वास्थ्य ”) अशी होती. यावर्षी कोल्हापूर जिल्हयात जिल्हास्तरावरुन आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य ‍ अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून 2025 रोजी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अशोका हॉल,गारगोटी येथे साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री मा. प्रकाश आबीटकर यांनी निरोगी राहण्यासाठी योग हा सुवर्ण मार्ग आहे. त्याचा अवलंब करुन सर्वांनी निरोगी व शतायुषी व्हावे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य ‍ अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे , भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय ‍अधिक्षक डॉ. पल्लवी तारळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद वर्धन, वैद्यकीय ‍अधिकारी डॉ. मिंलीद कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. संदीप पाटील, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कुलकर्णी व डॉ. सविता शेटटी तसेच गारगोटी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी व भुदरगड तालूक्यातील आरोग्य कर्मचारी आणि कर्मवीर हिरे महाविद्यालय व श्री शाहू कुमार भवनचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षक दत्तात्रय करवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योग प्रात्यक्षिके केली.

अधिक माहिती...