20
Jun 25
आज दिनांक 20 जून 2025 इ रोजी मौजे भेंडवडे येथील 15वर्षा पूर्वी पासून वहिवटीमध्ये असणारा
अतिक्रमण केलेला रस्ता खुला केला, सदर चा रास्ता हा मौजे भेंडवडे येथील गट क्रमांक
617,640,634,641,637,638,636,635,634,650,651,652,653,654,655,656,679,661,642 या गटातून जात
होता तो गेली काही काळापासून अतिक्रमण केलेल्या अवस्थेत होता तो रस्ता खुला केला गेला.
रस्ता खुला करीत असताना सदर रस्त्याचा लाभ हा किमान 60 ते 70 शेतकऱ्यांना होणार आहे तसेच
किमान 70 हेक्टर क्षेत्रास हा रस्ता वापरास येणार असून अंदाजे 1500 मीटर चा हा रस्ता खुला केला
गेला आहे. रस्ता खुला करीत असताना कुंभोज मंडळाचे मंडळ अधिकारी श्री अरुण शेट्टी, भेंडवडे
गावचे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती वर्षा अवघडे, भेंडवडे गावचे महसूल सेवक श्री नितिन कोळी
त्याच बरोबर पोलीस प्रशासन श्री शिंदे सो, पोलीस पाटील विलास जाधव तसेच संबंधित शेतकरी हजर
होते .