12
Aug 25
100 दिवसांमध्ये 100 शाळा - शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधन व जागृती करणे

"100 दिवसांमध्ये 100 शाळा - शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधन व जागृती करणे" राबविण्याबाबतची कार्यवाही प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर कडून सुरू केलेली आहे. त्याकरीता कार्यालयातील कार्यकारी अधिकाऱ्यांची तालुका/मुख्य शहरनिहाय 8 पथकांची नियुक्ती करून दर पथकास किमान 15 शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधनात्मक माहिती देण्यास आदेशीत केले आहे. 1.रस्ते सुरक्षेअंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट वापर करणे. 2.रस्ता सुरक्षा व चिन्हे/इशाऱ्यांबद्दल माहिती देणे. 3.अनिवार्य रस्ता चिन्हे/सावधगिरीची रस्ता चिन्हे याबाबतची माहिती देणे. 4.रस्ता अपघातातील पीडीतांना चांगले मदतनीस (Good Samiritans) होण्याकरीता उद्युक्त करणे. 5.पादचारी, सायकलस्वार आणि स्कूल बसेससाठी आवश्यक सुरक्षेविषयी माहिती देणे. 6.चांगले वाहन चालविण्यासाठी कौशल्य विकसीत करण्याबाबत माहिती देणे. 7.अतिवेगाने वाहन न चालविणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे, इत्यादी. आजअखेर या उपक्रमाव्दारे प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी आजअखेर जिल्हयातील सुमारे 49 शाळांना भेटी देऊन रस्ता सुरक्षा कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. या कार्यक्रमांसाठी शालेय प्रशासनाकडून ही उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रत्येक कार्यक्रमासाठी किमान 500 ते 600 विद्यार्थी उपस्थित असल्याचे निदर्शनास येत आहे. या उपक्रमांतर्गत जुलै-2025 अखेरपर्यंत संपुर्ण जिल्हाभर शाळांना भेटी देऊन किमान 100 शाळा/कॉलेज मधील विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेविषयी प्रबोधनात्मक माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षेविषयी महत्व/गरज लक्षात घेऊन भविष्यकाळात विद्यार्थी रस्त्यावर वाहने अधिक प्रगल्भपणे व विना अपघात चालवतील व त्याचा दुरगामी परिणाम होऊन जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यास आपोआपच मदत होईल, असा या विभागाचा मानस आहे. आजअखेर या कार्यालयाने 100 शाळा भेटीचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.

अधिक माहिती...
31
Jul 25
शिबीर कार्यालयांना भेटी देऊन ,अनुज्ञप्ती चाचणी ,वाहन तपासणी साठी येणाऱ्या नागरिकांना रस्ता सुरक्षा संबंधी तसेच प्रशासकीय गतिमानता अभियान ,तक्रार निवारण यासंबंधी जनजागरण करणे

शिबीर कार्यालय हुपरी येथे रस्ता सुरक्षा ,वाहतुकिचे नियम , सुरक्षात्मक वाहन चालन , वाहनांची देखभाल , अपघातग्रस्त व्यक्तींना करावयाची मदत , परोपकारी व्यक्ती संदर्भात शासनाने घेतलेले निर्णय/नियम यासंबंधी नागरिकांना मार्गदर्शहं केले. जबाबदार वाहन चालक म्हणून नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या ओंलीने प्रणाली यासंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करून शिबीर कार्यालयामध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेऊन उपाययोजना सुचवल्या.

अधिक माहिती...
30
Jul 25
रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शरद पॉलिटेक्निक यड्राव इचलकरंजी येथे रस्ता सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अधिक माहिती...
28
Jul 25
शालेय आणि कॉलेज च्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयक मार्गदर्शन.

यड्राव येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास कक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहुणे इचलकरंजी येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले, मोटर वाहन निरीक्षक राघवेंद्र पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ,दत्तात्रय शिर्के, ज्योती पाटील आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक स्वरूपा नागरे-पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय इंगवले म्हणाले, रस्ते सुरक्षा आणि अपघात या बाबी कमी करण्यासाठी जशी वाहतुकीच्या नियमांची माहिती असणे पुरेसे नाही तर ही समस्या सोडविण्यासाठी मानवी वर्तनात बदल होणे आवश्यक आहे. सुरक्षित प्रवासामुळे आपला तर जीव वाचवतोच पण इतरांचा जीवही आपण वाचवीत असतो हे लक्षात ठेवले पाहिजे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्याथिनीनी सहभाग घेतला.

अधिक माहिती...