5
Jul 25
🌱🌱मौजे मुंगुरवाडी येथे आज मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कार्यक्रम तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग, अंतर्गत "एक दिवस आपल्या बळिराजासाठी" कार्यक्रमा अंतर्गत श्री. वसंत पाटील, यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पीक कीड रोग नियंत्रण व व्यवस्थापन, याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हेक्टरी 125 टन ऊस उत्पादन वाढ अभियान अंतर्गत "ऊस पीक उत्पादकता वाढ स्पर्धा" याविषयी माहिती दिली. श्री. प्रकाश कोष्टी यांच्या पापड व शेवया उद्योग युनिटला भेट दिली. यावेळी महिला बचत गटांतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी बाबत मार्गदर्शन केले. तसेच ड्रॅगन फ्रूट लागवड केलेल्या प्लॉटला भेट दिली.
तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
त्यावेळी मा. श्री. सुधाकर खोराटे साहेब, सहा. गटविकास अधिकारी, पं. स. गडहिंग्लज, मा. श्री. तोळे साहेब, मंडळ अधिकारी महागाव, हावळ मॅडम, तलाठी मुंगुरवाडी, श्वेता वाळुंज, कृषि सहायक, मुंगुरवाडी, मा.सौ. कमल पाटील सरपंच मुंगुरवाडी, श्री. तानाजी पाटील, ग्राम. सदस्य , कृषिसखी सौ. माधुरी पाटील, कोतवाल , पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.🌱🌱