17
Jul 25
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), सन 2025 26 अंतर्गत तिरपण ता. पन्हाळा येथे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण महिला कृषी उत्पादक गट, तिरपण या शेतकरी गटाचा उद्घाटन कार्यक्रम तसेच दुग्ध व्यवसाय व कृषी प्रक्रिया विषयावरती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा(आत्मा), सन 2025 26 अंतर्गत तिरपण ता. पन्हाळा येथे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण महिला कृषी उत्पादक गट, तिरपण या शेतकरी गटाचा उद्घाटन कार्यक्रम तसेच दुग्ध व्यवसाय व कृषी प्रक्रिया विषयावरती शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा. श्री बसवराज मास्तोळी (विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर) , मा. सौ.रक्षा शिंदे (प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर), मा. श्री पोपट पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी कोल्हापूर) व मा. सौ. काव्यश्री घोलप (तालुका कृषी अधिकारी पन्हाळा) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री. आर. जे. ठोंबरे यांनी कृषीमाल प्रक्रिया उत्पादन तसेच पी एम एफ एम इ योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. व्ही. एस. लवटे (पशुधन पर्यवेक्षक) यांनी दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. रिसोर्स फार्मर श्री किशोर कुंभार, वाळेकरवाडी यांनी सेंद्रिय केळी उत्पादन व विक्री व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. चांगले काम करणारे शेतकरी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मा.सरपंच सौ. उज्वला चौगले, मा.मंडळ कृषी अधिकारी श्री. टी. एन. खोत उपस्थित होते, उप कृषी अधिकारी श्री . उदय पाटील, वैभव नाळे, आत्मा चे बीटीएम श्री आर.एस. चौगुले, सहाय्यक कृषी अधिकारी एस व्ही कांबळे, एटीएम विश्वजीत पाटील तसेच मंडळ कृषी अधिकारी कळे अधिनस्त सहाय्यक कृषी अधिकारी, शेतकरी गटातील सदस्य तसेच महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक माहिती...