8
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत दिनांक 8 जुलै 2025 रोजी SMAC भवन, कोल्हापूर येथे एक्झिम बँकच्या निर्यात प्रोत्साहन योजनेंतर्गत शिरोली मॅनुफॅक्चर्स असोसिएशन कोल्हापूरला देण्यात आलेल्या 3D प्रिसिजन स्कॅनिंग आणि सिमुलेशन टेक्नॉलॉजी मशीनचे अनावरण करण्यात आले. तसेच सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे एक्स्पोर्ट आउटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अभियांत्रिकी, टेक्सटाइल विविध क्षेत्रातील 200 उद्योजक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मा.महाव्यवस्थापक श्री. अजयकुमार पाटील यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्याची निर्यात क्षेत्रातील प्रगती, तसेच जास्तीत जास्त उद्योजकांनी निर्यातदार बनण्यासाठी निर्यात धोरणे व विविध योजना याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सदर कार्यक्रमात श्रीमती. दीपाली अग्रवाल, व्यस्थापकीय संचालक, एक्झिम बँक यांनी एक्झिम बँकेच्या निर्यात प्रोत्साहन योजनांबाबत मार्गदर्शन केले.