22
Jul 25
मधाचे गांव पाटगांव ता.भुदरगड येथील सामाईक सुविधा केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. बांधकाम ठेकेदार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारत पुर्णत्वाचा कालावधी हा 01 सप्टेंबर 2025 अखेर देणेत आलेला आहे. पाटगांव परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असलेने इमारतीचे कामकाज करत असताना अडचणी येत आहेत. तरी सुद्धा ठेकेदार यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामकाज 15 ऑगस्टच्या आत पुर्ण करणे बाबत लेखी स्वरूपात सुचना देणेत आलेल्या आहेत.