23
Jul 25
पिंपळगाव खुर्द मध्ये एकूण तीन ग्राम संघ आहेत , आदर्श , उज्वल , नवजीवन या तिन्ही ग्राम संघाच्या सभा ह्या पिंपळगाव मध्ये वेगवेगळ्या तारीख ला होतात. त्यामध्ये विषय पत्रिकेनुसार विषय घेतले जातात. ग्राम संघ स्तरावर लेखे अद्यावत , आर्थिक साक्षरता , आरोग्य मंच , व्यवसाय प्रशिक्षण असे विविध विषयाचे प्रशिक्षण आयोजित केले जाते. गटांचे मुल्यांकन करणे ,CIF मागणी परत फेड याबाबत लेखे अद्यावत ठेवणे, उपसमित्या बाबत माहिती घेतली जाते.