21
Jul 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत पंचायत समिती राधानगरी गटाकडील ग्रामपंचायत - शेळेवाडी,बरगेवाडी,कपिलेश्वर ,मजरे कासारवाडा,अर्जुनवाडा,बनाचीवाडी,खिंडी व्हरवडे,मांगोली,तारळे खुर्द,मानबेट या गावामध्ये सांडपाणी व घनकचरा प्रकल्पाचे कामे पूर्ण झाले आहेत.सांडपाणी व्यवस्थापन मध्ये सार्वजनिक शोषखड्ड्याची कामे करणेत आली आहेत व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावामध्ये प्लास्टिक केज व नाडेफ ची कामे पूर्ण करणेत आली आहेत.तसेच कुटुंब स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा करणे,सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे करिता वैयक्तिक स्तरावर शोषखड्डे,परसबाग ची निर्मिती करणे आदी विषय बाबत प्रचार प्रसिद्धी करणे बाबत उपक्रम घेणेत आले आहेत. सदरची दहा गावे सांडपाणी व घनकचरा मुक्त घोषित करणेत येत आहे.