16
Jul 25
पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागाने देखील मुख्यमंत्री प्रशायकीय गतीमान अभियानामध्ये जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील किमान 1 गाव याप्रमाणे 12 तालुक्यातील 12 गावे 15 ऑगस्ट 2025 पूर्वी प्लास्टीकमुक्त करणेचे उददीष्ट निश्चित केले आहे. जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान कालावधीत माहे जुलैपर्यंत जिल्हयातील 7 गावे प्लास्टीकमुक्त झालेली आहेत
जिल्हयातील प्लास्टीकमुक्त झालेली गावे -
वाटंगी (ता.आजरा), झांबरे (चंदगड), मुगळी (ता.गडहिंग्लज), मजरे कासारवाडा (ता.राधानगरी), गोलिवडे (ता.पन्हाळा), ऐनवाडी (ता.शाहूवाडी), फणसवाडी (ता.भुदरगड)
गावे प्लास्टीकमुक्त करणेसाठी खालीलप्रमाणे उपक्रम राबविणेत आले -
1. मुख्यमंत्री प्रशासकीय गतीमान अभियान अंतर्गत प्लास्टीकमुक्त गावाचे उददीष्ट जिल्हास्तरावरून निश्चित करण्यात आले. त्यानुसार तालुकास्तरावरून गावांची निवड करण्यात आली.
2. या उपक्रमामध्ये करावयाच्या कालबध्द कार्यवाहीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.
3. तालुकास्तरावर बैठकांच्या माध्यमातून या गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना गावे प्लास्टीकमुक्त करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
4. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम मासिक/ ग्रामसभा आयोजित करून एकल प्लास्टीकचा वापर थांबविणेबाबत ठराव करणेत आला.
5. ग्रामस्थ, दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यांच्यामध्ये प्लास्टीकचा वापर न करणेबाबत जनजागृती उपक्रम राबविणेत आले. त्यानंतर गावातील सर्व व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांना एकल प्लास्टीकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई होणार असलेबाबत ग्रामपंचायतीव्दारे नोटीस देण्यात आल्या.
6. 15 जून 2025 पासून तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पथकाव्दारे स्थानिक दुकाने, आठवडी बाजार येथे एकल प्लास्टीकची जप्त करणेची मोहिम राबविणेत आली.