10
Jul 25
उपक्रमाचे नाव:- जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर
वाढविण्याकरिता विशेष अभियान राबविणे.
उपक्रमाचे उद्दिष्ट:- इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व
संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे.
१. प्रस्तावना:
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) मध्ये इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करण्याचे उद्दिष्ट सन २०२६-२७ पर्यंत आहे. NAS व ASER अहवालातील स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी लक्ष्य केंद्रित कामकाज करणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 05 मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार “विद्यार्थ्यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम” राबविण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. सदर कृती कार्यक्रमाचे स्वरूप खालीलप्रमाणे.
२. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम उद्दिष्ट
इयत्ता दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75 % विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे
३. या कृती कार्यक्रमाची व्याप्ती:
1. इयत्ता : दुसरी ते पाचवी सर्व विद्द्यार्थी
2. सहावी ते आठवीच्या शिक्षक व विद्यार्थीसाठी ऐच्छिक
3. विषय: प्रथम भाषा व गणित
4. शाळा व्यवस्थापन: विनाअनुदानित शाळा व स्वयंअर्थासाहायीत शाळा वगळून सर्व
5. स्टेट बोर्ड अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा
४. कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी:
दिनांक 05 मार्च ते 30 जून २०२५
५. सुट्ट्यामधील सराव :
ऑफलाईन व ऑनलाईन
६. कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्षम नियोजन
1. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट व मार्गदर्शन
2. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांचेमार्फत आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मराठी व गुरुवारी गणित विषयाचा कृती कार्यक्रम कसा राबवायचा याचे वेबिणारर्द्वारे मार्गदर्शन
3. गटनिहाय अध्ययनाचे वेळापत्रक ठरवावे.
4. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवणे. जसे- अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्द कार्ड, चित्रे, वस्तू इत्यादी.
5. कार्यक्रमासाठीच्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल “चावडी वाचन व गणन” कार्यक्रमात सादर
6. दिनांक 30 जून, 2025 पर्यंत आपल्या इ. 2 री ते 5 वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७5 टक्के विद्यार्थी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावी.
7. इयत्ता 2 री ते 5 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकविणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी.
७. कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययनस्तर घोषित करणे.
1. सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी (Mapping) विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून,
2. वरील मुद्दा 6. (६) च्या आदेशान्वये मुख्याध्यापकांद्वारे ऑनलाईन स्वरुपात .
3. दिनांक 05/03/२०२५ रोजीच्या पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद
4. (विद्यार्थी निहाय व या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता परिशिष्ट १, २, ३, ४ मध्ये नमूद केलेल्या स्वरुपात) शिक्षकांनी नोंद करून ठेवावी आणि नंतर विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर नोंद
5. ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळ / Bot वर दि.20 मार्च, 0५ एप्रिल, 20 एप्रिल, 05 मे, २० मे, 15 जून आणि 30 जून २०२५ याप्रमाणे वर्ग / शाळांची आकडेवारी शाळा, केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल.
6. कृती कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दि. 30 जून, 2025 पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करुन अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेंव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे.
7. शिक्षकांनी उपरोल्लेखितपणे घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
8. मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. संपादित अध्ययन क्षमतांमध्ये सातत्य राहील या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव घेणे याची खात्री शिक्षकांनी करणे आवश्यक आहे.
८) अंतिम मूल्यांकन-
1. शिक्षकांनी स्वत: या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत त्वरीत भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक
2. वर्ग/शाळा भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेने विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर नोंद
3. सर्व भेटी दि.15 जूलै, 2025 अखेर पूर्ण करणे
4. ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषणा विद्या समिक्षा केंद्र (VSK) संकेतस्थळ / Bot वर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही, त्या वर्गावर या कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक / राज्य पातळीवरील असा कोणताही इतर उपक्रम जो, या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष्य ठेवतो, राबविण्यात येऊ नये.
९) लोकसहभाग व सामाजिक अंकेक्षण (Social Audit)-
1. दर 15 दिवसांनी गावपातळीवर “चावडी वाचन व गणन” कार्यक्रम राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखांना आयोजित
2. यात गावातील नागरिक, पालक यांना आमंत्रित करण्यात यावे. शहरी भागामध्ये शाळा व्यवस्थापन समिती अथवा पालक शिक्षक सभांमध्ये असे “वाचन व गणन कार्यक्रम” आयोजित करावेत.
3. “चावडी वाचन व गणन” कार्यक्रम 3० मार्च 2025 नंतर आयोजित करण्यात यावेत. एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमांचे आयोजन दि.30.03.2025 आधीही करता येईल.
4. दिनांक 01 मे, 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्येही “चावडी वाचन व गणन” सादरीकरण आयोजित करावे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा. यासाठी ग्रामसेवकांचे सहकार्य घ्यावे.
5. चावडी वाचन कार्यक्रमामध्ये, या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घेण्यात यावे. अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करु न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये.
6. या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकांची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात यावा.
१०) शिक्षकांसाठी सुलभीकरण -
१. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (maa.ac.in) संकेतस्थळावर “निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम” या विशेष टॅबवर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात येत आहेत.
२. “अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” या प्रशिक्षणातून (सन २०२३-24) शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी खालील सहा पायऱ्याचा वापर
1. विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
2. विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे.
3. अध्ययन उपक्रम/कृती.
4. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे.
5. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.
6. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे.
११) शिक्षक व शाळांना प्रशस्तीपत्रक-
1. विहित कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित
2. उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र
3. ज्या शाळा, शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल.
१२) मासिक शिक्षण परिषद-
माहे मार्च २०२५, एप्रिल २०२५, मे २०२५, जून २०२५ च्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा- जसे- अध्ययन स्तर, कृती कार्यक्रम कार्यपद्धती, उद्दिष्टे साध्य होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, उद्दिष्टे साध्य केलेल्या शिक्षकांचे अनुभव कथन, नियोजनपूर्वक केलेले कामकाज, नाविन्यपूर्ण बाबी, साहित्याचा वापर, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, इत्यादी.
१३) शाळा भेटी-
शाळाभेटी करताना पर्यवेक्षकीय यंत्रणेने कृती कार्यक्रमातील मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. सुरु असलेल्या कामाचा आढावा घ्यावा, मार्गदर्शन व सहाय्य करावे.
१४) जबाबदार घटक-
अ) विद्या समीक्षा केंद्र (VSK)- वर्ग व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी (Mapping) मुद्दा क्र. 6. (६) अंतर्गत आदेशान्वये करणे. वर्ग घोषित करण्याची विद्यार्थीनिहाय ऑनलाईन सुविधा पुरविणे. पडताळणीबाबत माहिती भरल्यानंतर त्याबाबत प्रगतीदर्शक व स्थितीदर्शक विविध अहवाल तयार करुन प्रसिद्ध करणे.
आ) शिक्षक- मुद्दा क्र. 6. (ऊ) अंतर्गत आदेशान्वये शिक्षक या या कृती कार्यक्रमासाठीच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य करतील.
इ) मुख्याध्यापक- शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा करणे, विद्यार्थी व शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे, चावडी वाचन व गणन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे. मुख्याध्यापकांनी मुद्दा क्र. 6. (ऊ) अंतर्गत शिक्षकांचे आदेश दि.06/03/2025 पूर्वी निर्गमित करावेत.
ई) पर्यवेक्षण यंत्रणा- पर्यवेक्षण यंत्रणेने वर्गभेटीच्या वेळी वर्गातील अपेक्षित वाचन व गणन क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत व त्यामध्ये सातत्य आहे याची खातरजमा करावी. परिस्थितीनुरुप आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन द्यावे. प्रत्येक पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी दर आठवड्यात विद्या समिक्षा केंद्र (VSK) वर या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त न झालेल्या किमान ५ शाळांना भेटी देऊन शिक्षकांना सहाय्य करावे व अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करणे
उ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरणे, आणि सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था - विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी आवश्यक सराव साहित्य, जादूई पिटारा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) इ. साहित्याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन
ऊ) आयुक्त (शिक्षण) व शिक्षण संचालक (प्राथमिक)- यांनी या कृती कार्यक्रमाची काटेकोर व विहित मुदतीत यशस्वी अंमलबजावणी होईल यासाठी सर्व अधिनस्त कार्यालये व अधिकारी यांचे प्रभावी संनियंत्रण