26
Jun 25
आज दिनांक 26 जून 2025 इ रोजी मंडळअधिकारी कार्यालय कुंभोज या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान 2025 आयोजित केले गेले. छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली गेली, कार्यक्रमाचे अध्यक्षपदी कुंभोज गावचे सरपंच उपस्थित होते त्याच बरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद शिंगे यांनी केले त्याच बरोबर कार्यक्रमास कुंभोज *मंडळाचे मंडळ अधिकारी श्री अरुण शेट्टी, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक, ग्रामपंचायत अधिकारी , तसेच मंडळातील सर्व महा इ सेवा केंद्र चे कर्मचारी व मंडळातील लाभार्थी उपस्थित होते.सदर अभियानात विविध प्रकारचे दाखले, त्या मध्ये जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेयर दाखले, उत्पन्न दाखले, डोमीसाईल दाखले, शेतकरी दाखले, अल्पभूधारक दाखले त्याचबरोबर आर्थिक मागास असलेचे दाखले (EWS) असे एकूण ३७२ दाखले व पेन्शन योजनेचे आदेश वाटप करणेत आहे 💐