22
Jul 25
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील अंगणवाडी बालकांची वर्षातून दोनवेळा व शाळेतील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची एकवेळ आरोग्य तपासणी केली जाते. १ मे पासून चालू झालेल्या या उपक्रमात जिल्यातील सर्व अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली . तपासणीमध्ये किरकोळ आजारी बालकाना जागेवरच औषधोपचार केले. दुर्धर व गंभीर आजारी बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिह्वा / ग्रामीण तसेच जिह्वा रुग्णालयात संदर्भित केले. संदर्भित केलेल्या बालकांसाठी तज्ज्ञांकडून संदर्भ सेवा शिबीर घेण्यात आले . शस्त्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या बालकांच्या शस्त्र क्रिया उपजिह्वा / ग्रामीण तसेच जिह्वा रुग्णालयात केल्या गेल्या . हृदय शस्त्रक्रिया व कॉक्लीअर इम्प्लांटसाठी सामंजस करार झालेल्या हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या . वैद्यकीय पथकामार्फत शस्त्रक्रिया झालेल्या बालकांच्या पाठपुरावा केला जातो. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रथम आलेबद्दल ७ एप्रिल २०२५ रोजी माननीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे गौरवण्यात आले. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत उध्दिष्टप्रमाणे अंगणवाडी व शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.