5
Aug 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रोगनिदान शिबिर (ग्रामीण रुग्णालय, चंदगड)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, चंदगड, तालुका चंदगड येथे दिनांक ०२/०८/२०२५ रोजी वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी मधून संदर्भित केलेल्या मुलांसाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरास एकूण १३ लाभार्थी उपस्थित होते. या मध्ये PHIMOSIS- १0, Murmur-2 व Cyst -१ या मुलांची तपासणी करण्यात आली. सदर शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गजेंद्र पाटील (बालरोग तज्ञ ) म्हणून उपस्थित होते.

अधिक माहिती...
1
Aug 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत संदर्भ सेवा शिबिर (वसाहत रुग्णालय, गांधीनगर , तालुका करवीर)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वसाहत रुग्णालय, गांधीनगर , तालुका करवीर येथे वैद्यकीय पथकाने आरोग्य तपासणी मधून संदर्भित केलेल्या बालकासाठी दिनांक ०१/०८/२०२५ रोजी संदर्भ सेवा शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरास एकूण ३२ लाभार्थी उपस्थित होते. यामध्ये MAM, Phimosis व Anemia चे लाभार्थी उपस्थित होते. सदर शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर (कान नाक घसा तज्ञ ), डॉक्टर कांबळे मॅडम (बालरोग तज्ञ ) म्हणून उपस्थित होते. तसेच या शिबीराकरिता प्रयोगशाळेतील अधिकारी , क्ष किरण तज्ञ व इतर स्टाफ चे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती...
29
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया ( Mitral Valve Replacement )

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत उपजिल्हा रुग्णालय गारगोटी , तालुका भुदरगड येथील पथकाने जवाहर हायस्कुल, नीळपण, तालुका भुदरगड या भागातील शाळा तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या संध्या कांबळे , वय १२ वर्षे इयत्ता ६ वी या मुलीची फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया ( Mitral Valve Replacement ) झालेली आहे.

अधिक माहिती...
25
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबीर ( ग्रामीण रुग्णालय दत्तवाड , तालुका शिरोळ )

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय दत्तवाड , तालुका शिरोळ येथील पथकाने आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या मुलांसाठी दिनांक २५/०७/२०२५ रोजी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते . सदर शिबिरामध्ये Phimosis -2, Mucocele-1 च्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरामध्ये डॉक्टर आर . बी . जाधव {सर्जन } व डॉक्टर स्नेहल व्हटकर मॅडम { भूलतज्ञ् } म्हणून उपस्थित होते .

अधिक माहिती...
24
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबीर ( ग्रामीण रुग्णालय सोळांकूर , तालुका राधानगरी )

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय सोळांकूर , तालुका राधानगरी येथील पथकाने आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या मुलांसाठी दिनांक २३/०७/२०२५ रोजी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते . सदर शिबिरामध्ये cirumcision -13, Cystic Mass-1 व Appendectomy-1 च्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरामध्ये डॉक्टर धीरज महाजन {सर्जन } व डॉक्टर ज्योती कोले मॅडम { भूलतज्ञ् } म्हणून उपस्थित होते .

अधिक माहिती...
23
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत सॅम - मॅम व इतर आजर असलेल्या बालकांसाठी संदर्भसेवा शिबीर (ग्रामीण रुग्णालय हातकणंगले)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत दिनांक २२/०७/२०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय हातकणंगले, तालुका हातकणंगले येथील वैद्यकीय पथकाने अंगणवाडी व शाळा तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या सॅम - मॅम व इतर आजर असलेल्या बालकांसाठी संदर्भसेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास एकूण ६५ लाभार्त्यानी शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश जाधव , बालरोग तज्ञ् म्हणून डॉक्टर जितेंद्र हूपरे उपस्थित होते.

अधिक माहिती...
21
Jul 25
राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबिर (सेवा रुग्णालय क़सबा बावडा)

राष्ट्रीय आरोग्य अभियान ,राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सेवा रुग्णालय क़सबा बावडा ,तालुका करवीर येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून संदर्भित केलेल्या शस्त्रक्रिया साठी पात्र असणाऱ्या बालकांसाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरामध्ये Hydrocele - 1, Undesended Testies -2 अश्या एकूण ३ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत . या शस्त्रक्रिया शिबिरासाठी डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे (बालरोग शल्यचिकित्सक ),डॉक्टर सुनील कुरुंदवाडे (सर्जन) इ .यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.

अधिक माहिती...
18
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत प्राचार्य, ए .डी माने इंटरनॅशनल अकेडमी, कागल (आरोग्य तपासणी)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत नगरपालिका विभाग (सी. पी. आर ) कोल्हापूर यांच्या पथकाने दिनांक १७/०७/२०२५ रोजी प्राचार्य, ए .डी माने इंटरनॅशनल अकेडमी, कागल येथील बालवाडी ते १० वी पर्यंतच्या एकूण २३१ मुला मुलींची आरोग्य तपासणी केली आहे. यामध्ये ३५ मुलांना जागेवरच औषधोपचार करण्यात आले. तसेच तपासणी मधून ४३ मुलांना संदर्भित करण्यात आले आहे. सदर तपासणी कामी प्राचार्य , शिक्षक व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तपासणी चांगल्या प्रकारे झालेबद्दल प्राचार्य , शिक्षक व इतर कर्मचारी यांनी नगरपालिका विभाग (सी. पी. आर ) कोल्हापूर पथकाचे आभार मानले.

अधिक माहिती...
16
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया (ASD Surgical Closure)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत महानगरपालिका पथक क्रमांक १ (सी पी आर) कोल्हापूर यांनी राजारामपुरी, कोल्हापूर ;या भागातील अंगणवाडी क्रमांक १४ मध्ये आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या ध्रुविका नितीन रणदिवे , वय १ वर्षे ७ महिने या बाळाची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया (ASD Surgical Closure) झालेली आहे.

अधिक माहिती...
14
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया (ग्रामीण रुग्णालय, आजरा पथक क्रमांक १)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत ग्रामीण रुग्णालय, आजरा पथक क्रमांक १, तालुका आजरा यांनी इटे या भागातील अंगणवाडी क्रमांक २२ येथील तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या अनुश्री सागर पाटील, वय १० महिने या बाळाची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया (ICR- TOF c- ASD c- VSD) झालेली आहे.

अधिक माहिती...
9
Jul 25
आरोग्य शिबीर शिवाजी मंदिर , शिवाजी पेठ कोल्हापूर (दिनांक १९/०६/२०२५)

कोल्हापूर क्षेत्रातील गोरगरीब तथा निर्धार नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य शिबीर शिवाजी मंदिर , शिवाजी पेठ कोल्हापूर या ठिकाणी दिनांक १९/०६/२०२५ रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कान, नाक , घसा , डोळे , त्वचा, रक्त तपासणी, पोट विकार इ . रोगनिदान तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरा मध्ये २०० लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबीराकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत महानगरपालिका वैद्यकीय पथक क्रमांक २ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती...
8
Jul 25
भव्य बाल वारकरी संमेलन निमित्त मोफत आरोग्य शिबीर मराठी शाळा माळवाडी शिये, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर (दिनांक १५/०५/२०२५)

मराठी शाळा माळवाडी शिये, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी दिनांक १५/०५/२०२५ रोजी भव्य बाल वारकरी संमेलन निमित्त मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कान, नाक , घसा , डोळे , त्वचा, रक्त तपासणी इ . रोगनिदान तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरा मध्ये ४५० लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबीराकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत ग्रामीण रुग्णालय खुपीरे वैद्यकीय पथक क्रमांक १ व २ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती...
7
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकमांतर्गत शस्त्रक्रिया शिबीर (सेवा रुग्णालय, कसबा बावडा कोल्हापूर)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकमांतर्गत सेवा रुग्णालय, कसबा बावडा कोल्हापूर येथे जिल्यातील कार्यरत वैदयकिय पथकाकडून शस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आलेल्या मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये hernia -१ ,hydrocele -२ undescended testis-1, इ प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वी रित्या झालेल्या आहेत . या शस्त्रक्रियेकरिता बाल शल्य चिकिसक म्हणून डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे, डॉक्टर सुनील कुरुंदवाडे (सर्जन ) उपस्थित होते.

अधिक माहिती...
7
Jul 25
केंद्र मुख्याध्यापक पी. एम .श्री म .न .पा महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी क्रमांक २१, कोल्हापूर (आरोग्य शिबीर )

केंद्र मुख्याध्यापक पी. एम .श्री म .न .पा महात्मा फुले विद्यालय, फुलेवाडी क्रमांक २१, कोल्हापूर या ठिकाणी दिनांक २०/०२/२०२५ रोजी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरामध्ये कान, नाक , घसा , डोळे , त्वचा इ . रोगनिदान तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरा मध्ये ६३८ लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. या शिबीराकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत महानगरपालिका वैद्यकीय पथक क्रमांक २ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अधिक माहिती...
4
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया (VSD with MVR)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत कार्यरत महानगरपालिका पथक क्रमांक १ (सी पी आर) कोल्हापूर यांनी अंगणवाडी तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या इशिता काळे, वय ७ महिने या बाळाची फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया (VSD with MVR) झालेली आहे.

अधिक माहिती...
3
Jul 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबीर (उपजिल्हा रुग्णालय गडहिंगलज )

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय गडहिंगलज , तालुका गडहिंग्लज येथील पथकाने आरोग्य तपासणी दरम्यान संदर्भित केलेल्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते . सदर शिबिरामध्ये २ फायमोसिस, १ फ़ेमोरल हर्नियाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सदर शिबिरामध्ये डॉक्टर चंद्रकांत खोत {सर्जन } व डॉक्टर स्वाती पाटील मॅडम { भूलतज्ञ् } म्हणून उपस्थित होत्या .

अधिक माहिती...
25
Jun 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया शिबीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यकमांतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले , येथे कार्यरत वैदयकिय पथकाकडून शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये Circumcision - 5 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यावेळी सर्जन डॉ. राजीव जाधव व भुलतज्ञ - डॉ . स्नेहल व्हटकर यांचे सहकार्य लाभले .

अधिक माहिती...
19
Jun 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत क्लब फूट दोषी असलेल्या बालकावर Tenotomy ची यशस्वी शस्त्रक्रिया व TONGUE TIE , SAM /MAM अशा १० बालकासाठी संदर्भ सेवा शिबीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज येथील कार्यरत पथक क्रमांक २ यांनी संदर्भित केलेल्या क्लब फूट दोषी असलेल्या बालकावर खाजगी रुग्णालयामध्ये Tenotomy ची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण रुग्णालय , पारगाव येथे RBSK वैद्यकीय पथकाकडून तपासणी मधून संदर्भित करण्यात आलेल्या TONGUE TIE , SAM /MAM अशा १० बालकासाठी संदर्भ सेवा शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिरास डॉक्टर ज्योती कांबळे ( बालरॊग तज्ञ ) म्हणून उपस्थित होत्या.

अधिक माहिती...
18
Jun 25
राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया शिबिर व संदर्भसेवा शिबीर

राष्ट्रीय आरोग्य अभियान ,राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत सेवा रुग्णालय क़सबा बावडा ,तालुका करवीर येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून संदर्भित केलेल्या शस्त्रक्रिया साठी पात्र असणाऱ्या बालकांसाठी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरामध्ये Hydrocele - 1,Hernia-1 phimosis-2 अश्या एकूण ४ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत . या शस्त्रक्रिया शिबिरासाठी डॉक्टर शिवप्रसाद हिरुगडे (बालरोग शल्यचिकित्सक ),डॉक्टर सुनील कुरुंदवाडे (सर्जन) इ .यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. राष्ट्रिय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय हातकणंगले येथील कार्यरत वैद्यकीय पथकाकडून कान ,नाक ,घसा दोष असणाऱ्या बालकांसाठी संदर्भसेवा शिबीर सामान्य रुग्नालय IGGH Ichalkarnji येथे घेण्यात आले होते . सदर शिबिरास ५ मुलांना संदर्भसेवा देण्यात आल्या.

अधिक माहिती...
17
Jun 25
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया शिबीर

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय राधानगरी व ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथे कार्यरत वैद्यकीय पथकाकडून शस्त्रक्रिया साठी पात्र ठरलेल्या मुलांसाठी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते. या मध्ये एकूण फायमोसिस चे १३ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.

अधिक माहिती...