7
Jul 25
मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका कार्य क्षेत्रातील
सर्व कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे या उपक्रमाचा समावेश आहे.
या अनुषंगाने आज सोमवार दि.
७ जुलै रोजी नागरी आरोग्य केंद्र, तांबे माळ येथे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते परिसरातील लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले.
यावेळी सहा.आयुक्त विद्या कदम, सहा.आयुक्त रोशनी गोडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ दिनेश चव्हाण, डॉ.
कश्मीरा बडबडे, डॉ. प्राची ढाले, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उपलेखापाल रामचंद्र कांबळे,
कर अधीक्षक दिपक खोत, रेकॉर्ड कीपर सदाशिव गोनुगडे यांचेसह तांबे नागरी आरोग्य केंद्राकडील
परिचारिका, कर्मचारी आणि आशा वर्कर उपस्थित होत्या.