2
Aug 25
पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरामध्ये मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतगर्त संस्कार शिबिर पालक मेळावा संपन्न.
पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा मध्ये आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री गतिमान प्रशासन संस्कार शिबिर अंतर्गत पालक मेळावा व व्यसनमुक्ती असा संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम पाहुण्यांच्या तसेच मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकेत व्यसनाधीनते पासून विद्यार्थ्यांना वाचवायचं असेल तर त्यांच्यावर संस्कार केले पाहिजेत .पुस्तक वाचनावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे .पालक, विद्यार्थी ,शिक्षक यांच्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे, मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.
व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम थांबविण्यासाठी शासन, शाळा, शिक्षक, पालक आणि संस्था यांनी सजग राहिले पाहिजे असे सांगितले .यानंतर प्रमुख व्याख्याते श्री .विनायक राजयोगी यांचे स्वागत संस्थेचे संचालक श्री. सुधीर परळकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. बिरजे गुरुजी यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .संजीव देसाई यांनी केले .संस्थेचे संचालक श्री. सुधीर परळकर यांचे स्वागत विजय राजोपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाचे व्याख्याते श्री. विनायक राजयोग यांनी पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरा ही एक विद्यार्थ्यांना संस्कार देणारी शाळा आहे असे शाळेबद्दलचे मत व्यक्त केले.व्यसनमुक्ती या विषयावर बोलत असताना त्यांनी असे सांगितले ,की शरीर हे कचऱ्याचा डबा आहे .यामुळे आपल्या शरीराचे आरोग्य बिघडते. यासाठी आपण चांगल्या प्रकारे शरीराला जपले पाहिजे .कारण शरीर हे आपले मंदिर आहे .आत्मा देवता आहे .आपण शरीराची काळजी घेतली पाहिजे .आज मुले व्यसनाधीन झालेली दिसतात . त्यामुळे आपला देश कमजोर बनण्याची शक्यता आहे.त्यासाठी प्रथम आपण आपले आरोग्य चांगले ठेवली पाहिजे .