11
Jul 25
लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत प्रत्येक गावातील किमान दहा शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर त्यांच्या पत्नीचे नांव सहधारक म्हणून नोंद करणे.
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेपाठोपाठ लक्ष्मी मुक्ती योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी विनामुल्य तात्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे. या योजनेतून पतीच्या सातबारावर पत्नीची सहहिस्सेदार म्हणून
विनामूल्य नाव नोंदणी होणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिरोलीच्या मंडल निरीक्षक सीमा मोरये यांनी केले. अध्यक्षस्थानी पंचगंगा पाणीपुरवठा अघ्यक्ष राजेश पाटील होते. यावेळी
शिरोलीचे ग्राम महसूल अधिकारी महेश सुर्यवंशी यांनी तात्कळ नाव नोंदणी करुन सातबारा शेतकऱ्यांना ताब्यात दिल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रकाश कौंदाडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक नागांव महसूल अधिकारी श्रध्दा अंबपकर
यांनी केले. स्वागत माजी अध्यक्ष राजू पाटील यांनी केले .नियोजन महसूल सेवक संदीप पुजारी, दादाभाई देसाई यांनी केले. यावेळी नवजीवन सोसायटीचे संचालक अभिजीत पाटील, ग्रा.पं. सदस्य दीपक यादव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.