5
Jul 25
मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत एक दिवस बळीराजासाठी उपक्रमांतर्गत CRA तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड करणे.सदर उपक्रमांतर्गत तालुक्यातील विविध गावामध्ये फळबाग लागवड करून प्रात्यक्षिक दाखविणेत आले.ग्रामपंचायत मांगोलीचे सरपंच श्री नेताजी पाटील,कृषी विकास अधिकारी अरुण मगदुम ,ग्रामपंचायत अधिकारी संजय हारुगले , उप कृषी अधिकारी दिपाली लाड व लाभार्थी संजय संगनाप्पा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत केळो शी बु येथील अनिल तानाजी जाधव यांचे गट नंबर २१४ मध्ये माजी उपसरपंच सागर पाटील,विस्तार अधिकारी कृषी शंकर पाटील,उप कृषी अधिकारी राहुल चौगले,ग्रामपंचायत अधिकारी दीपक बागडी,ग्राम महसूल अधिकारी विवेक पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.