13
Aug 25
ग्रामपंचायत कारिवडे अंतर्गत कारिवडे, दिगस, राऊतवाडी, बौद्धवाडी, रानोशेवाडी या गावांचा समावेश येतो. या सर्व गावांना पूर्वी झऱ्यावरील गुरुत्व नळ पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा होत होता उन्हाळ्यामध्ये झऱ्यामधील पाण्याची आवक कमी झाल्यानंतर सर्व वाड्यांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे सदर वाड्यांचा समावेश जल जीवन मिशन अंतर्गत योजनेमध्ये करून सर्व वाड्यांना स्वतंत्र न पाणीपुरवठा योजना करण्यात आली.
कारीवडे , राऊतवाडी व बौद्धवाडी या गावांकरिता राधानगरी धरणाच्या जलाशयामध्ये तराफा घेऊन त्यावरती पंप बसवून नवीन दाबनलिके द्वारे तीन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यात आल्या. या गावांमध्ये बैठी पाण्याच्या टाक्या बांधून त्याद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्यात आला पाणी पुरवठ्या करता बारमाही स्त्रोत उपलब्ध झाल्याने या गावांची पाणीटंचाई दूर झाली आहे. तसेच डिगस करिता पूर्वी एकाच झऱ्यातून योजना होती, झऱ्याचे पाणी कमी आल्याने अपुरा पाणी पुरवठा होत होता , आता चांगली आवक असलेले तीन झरे एकत्र करून त्याद्वारे गावात पाणीपुरवठा योजना करण्यात आली , त्यामुळे त्या ठिकाणी देखील आता पाणी टंचाई जाणवत नाही