24
Jul 25
मा.मुख्य मंत्री प्रशासकिय गतीमानता अभियानाच्या अंतर्गत पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कागल च्या माध्यमातून उत्कृष्ट पशुपालक व स्वच्छ, सुंदर गोठा अभियान राबविणे हि मोहिम राबवण्यात येत आहे. यासाठी १५० पशुपालकांची निवड करण्यात आलेली आहे. या अंतर्गत या पशुपालकांना स्वच्छ दुध उत्पादन, गोठ्यातील स्वच्छता , जनावरांचे लसीकरण, निकृष्ठ चारा सकस करणेयाबाबत माहिती, गोचीड व जंत निर्मूलन यासारख्या विषयांची माहिती व मार्गदर्शन प्रत्यक्ष भेट देऊन करण्याची कार्यवाही सुरु आहे.