21
Jul 25
समाजकल्याण व इतर बहुजन कल्याण विभागाकडील सर्व शासकीय व अनुदानित शाळा व वसतीगृहे यांच्या दर्जात्मक सुधारणांसाठी तपासणी करणे.

उपरोक्त विषयास अनुसरून मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानअंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत अनुदानित वसतिगृहांच्या दर्जात्मक सुधारणांसाठी तपासणी करणे हा उपक्रम राबविणेत येत असून सदर उपक्रमाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यरत अनुदानित वसतिगृहांची तपासणी करून संबंधित संस्थांना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांकरिता राहण्यासाठी असणाऱ्या इमारतींचा दर्जा व इतर आवश्यक सोयी-सुविधा याबाबत सुधारणा करणेसाठी भेटी देवून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक १५ जुलै अखेर चंदगड, आजरा, गडहिंग्लज व भुदरगड या तालुक्यातील मुला-मुलींच्या १७ वसतिगृहांना भेटी देण्यात आल्या आहेत. व उपरोक्त बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अधिक माहिती...