12
Aug 25
खाजगी प्रवासी वाहतूक तसेच ऑटो रिक्षा प्रवासी वाहतूक संदर्भातील प्रवाशांच्या विविध तक्रारींचे निरसन करण्याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर कडून व्हाट्सअप क्रमांक 9423012134 कार्यान्वित केलेला आहे
सदर व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित केल्याबाबत जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर यांना सर्व स्थानिक वृत्तमानपत्रातून प्रसिध्दी देण्याबाबत अवगत केले आहे. तसेच याबाबतची माहिती कार्यालयीन सूचना फलकावर प्रदर्शित केली आहे.
या उपक्रमास व्यापक प्रसिध्दी मिळणेसाठी कार्यालयाकडून स्टिकर्स छपाई करण्यात आली असून कोल्हापूर शहरातील सर्व मोक्याची वाहतूकीची ठिकाणे, तालुक्यातील मुख्य शहरातील वाहतूक वर्दळीची ठिकाणांवरती स्टिकर्स प्रदर्शित करण्यात येत आहेत.
सद्यस्थितीस या व्हॉटसॲप क्रमांकावरती प्राप्त होणाऱ्या तक्रारींची संख्या नगन्य असून त्यामध्ये प्रामुख्याने कार्यालयीन कामकाजासंदर्भातील विविध माहितींची व कार्यपध्दतीची विचारणा होत आहे.
खाजगी प्रवासी वाहतूक संदर्भातील जादा भाडे आकारणीबाबत प्राप्त होणा-या प्रवाशांच्या विविध तक्रारींची दखल घेऊन त्यावर प्रभावी कार्यवाही करण्यासाठी खटला विभाग, नियंत्रक अधिकारी तथा सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना जारी केल्या आहेत.