7
Aug 25
दिनांक 1 ऑगस्ट, 2025 रोजी “महसूल दिन व दिनांक 1 ते 7 ऑगस्ट,2025 या कालािधीत “महसूल सप्ताह-2025” साजरा करण्याबाबत शासनाने दिलेल्या निर्देशानुसार व मा. जिल्महाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी फेरफार अदालत आयोजन करण्यात आले. कागल मंडळातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारले व विविध प्रकारचे दाखले, ७/१२ व फेरफार ई. चे वाटप करण्यात आले. जिवंत ७/१२ मोहिमे अंतर्गत ज्या ७/१२ वर मयत शेतकऱ्यांचे नाव कमी करून वारसांची नावे लावली, अपाक कमी केले, तगाई बोजे- बंडिंग बोजे कमी केले त्यांचे तसेच लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत ७/१२ सदरी सामायिक मध्ये पत्नीचे नाव लावले त्यांना ७/१२ वितरीत करण्यात आले.