30
Jul 25
मौजे -माले ता -पन्हाळा जिल्हा-कोल्हापूर येथे आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी महादेव मंदिर माले येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत माती परीक्षण करणे साठी माले गावची निवड करण्यात आली होती.त्याप्रमाणे मृद नमुना 100 काढण्यात आले. मृदपरिक्षण अहवालानुसार खतांची मात्रा उपलब्ध कशी करावी आणि जमीन सुपिकतेचे महत्व या बाबत याबद्दल उपस्थित शेतकरी ,महिला भगिनी यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मा.काव्यश्री घोलप मॅडम, तालुका कृषी अधिकारी यांनी माती परीक्षण महत्व व कृषी विभागाच्या विविध योजनाची माहिती तसेच लाभार्थी भेट व औजारे तपासणी केले.
श्री. तांदळे, मृद सर्वेक्षण व मुदा चाचणी अधिकारी यानि यांनी सविस्तर माहिती दिली. माती परीक्षण म्हणजे जमिनीतल विविध घटकांचे विश्लेषण करणे, ज्यामुळे पिकांसाठी योग्य खतांची मात्रा ठरवता येते आणि जमिनीची सुपीकता तपासता येते. याबाबत मार्गदर्शन केले
पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी मदत होते. याबद्दल सविस्तर मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी मान .श्रीमती.के.एम.घोलप यांनी करण्यात आले. यावेळी आत्मा योजनेचे BTM श्री. चौगुले व ATM श्री. पाटील गावातील पदाधिकारी उपसरपंच गुरव मॅडम, प्रयोगशील शेतकरी, प्रयोगशील शेतकरी उपस्थित होते. वृषाली कुंभार सकृअ माले यांनी आभार मानले.