23
Jun 25
दिनांक 23/6/2025 रोजी कुडूत्री ता राधानगरी येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्या वतीने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान शेतकरी प्रशिक्षण आणि हुमणी मोहीम अंतर्गत भुंगे गोळा करण्याच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना हुमणी चा कार्यकाळ आणि त्यावरील कोणत्या उपाय करावेत यावर सखोल मार्गदर्शन श्री डॉ.अभयकुमार बागडे सहायक प्राध्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर यांनी केले..
भात लागवडीसाठी बीजप्रक्रिया कशी करावी, रोपवाटिका नियोजन ,खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन श्री डॉ शैलेश कुंभार शास्त्रज्ञ भात संशोधन केंद्र राधानगरी यांनी केले..
भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी निम कोटेड युरिया वापरा, आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवा , चारसूत्री भात लागवड करा आणि उत्पादन खर्च कमी करा याबाबत सविस्तर माहिती श्री अरुण भिंगार देवे साहेब उपविभागीय कृषी अधिकारी करवीर यांनी केले.
कार्यक्रम साठी श्रुतिका नलवडे तालुका कृषी अधिकारी , अनिल भोपळे मंडळ कृषी अधिकारी ,दीपक शेट्टी आत्मा सदस्य , शांताराम बुगडे आत्मा सदस्य , शिवाजी चौगले सरपंच , सुनिल कांबळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रणजित गोंधळी उप कृषी अधिकारी, महेंद्र गायकवाड उपकृषी अधिकारी , महेंद्र कांबळे ,राहुल पाटील ,मनोज गवळी,सविता बकरे ,निखिल पाटील,राजेंद्र पाटील, कृष्णात जाधव ,निकिता तीलगामे सहायक कृषि अधिकारी , सर्व शेतकरी, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
बक्षीस वाटपामध्ये श्री तानाजी यशवंत पाटील यांचा प्रथम क्रमांक आला त्यांनी 3620 इतके भुंगे सापळे लावून पकडले, द्वितीय क्रमांक सुरेश अंतू पंडे -2460 ,तृतीय क्रमांक श्री अशोक श्रीपती चौगले 1867, चतुर्थ क्रमांक निवास शांताराम पाटील -1860 भुंगे सापडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री युवराज पोवार यांनी केले
कार्यक्रम स्थळी पीक प्रात्यक्षिक चे प्रदर्शन मांडण्यात आले होते