4
Jul 25
मा.ना.श्री.प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांचे संकल्पनेतून व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांचे सुचनेनूसार उप निबंधक, सहकारी संस्था,हातकणंगले कार्यालयाकडून मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत निमित्त हातकणंगले तालुक्यातील सहकारी संस्थाशी निगडीत तक्रार निवारण शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात 14 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर प्राप्त झालेल्या 14 अर्जावर योग्य ती कार्यवाही करणेत आलेली आहे. सदरचे शिबीर हे मा.आमदार डॉ. अशोकराव माने, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, सहकारी संस्था उपनिबंधक डॉ.एस.एन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.सदरचे शिबीर हे श्री.निलकंठ करे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.एस.एन जाधव,उपनिबंधक,सहकारी संस्था,हातकणंगले यांचे देखरेखी खाली पार पडले.